Living up to our motto — सर्वे भवन्तु सुखिनः — we’ve been earnestly striving for happiness and well-being of the society at large. Through our naturopathy and healthcare modules, we’ve been working at detoxifying your body and rejuvenating your mind thereby elevating your life energy levels.
Sanjeevan Nature Cure truly believes in what Hippocrates has said about the nature that it has immense healing power for rejuvenating oneself, mentally and physically. We are a non-profit Socio-Medical Organisation working for the wellness of senior citizens, rural, and urban people. With a sole aim of taking you closer to the nature we assure you the experience that will make you return home with a new energy vitality and a strong desire to find a changed course in life, and hence bringing you here again and again. Remember, your body loves you so much that it becomes important for you to acknowledge it.
‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या आमच्या ब्रीदवाक्याला अनुसरून आम्ही समाजातील विविध घटकांच्या स्वास्थ्य व समाधानासाठी कार्यरत आहोत. आमचे विविध निसर्गोपचार व स्वास्थ्य उपक्रम तुम्हाला तुमचे शरीर आणि मन निरोगी राखण्यास मदत करतील तसेच त्याद्वारे जीवनशक्तीचा विकास घडवून आणण्यातही मदत करतील. प्रसिद्ध ग्रीक वैद्यकशात्रज्ञ हिपोक्रेटिस यांनी म्हटल्याप्रमाणे आम्हीही असे मानतो की निसर्गात शरीराला आणि मनाला बरे करण्याची तसेच बळ देण्याची शक्ती आहे. संजीवन नेचर क्युअर विना-नफा तत्वावर चालणारी संस्था असून जेष्ठ नागरीक आणि त्यासोबत ग्रामीण व शहरी लोकांच्या स्वास्थ्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. आमचा एकमेव उद्देश तुम्हाला निसर्गाच्या जवळ आणणे हा आहे. आम्हाला खात्री आहे की निसर्गाच्या कुशीत वास्तव्य करून घरी परतत असतांना तुम्ही सोबत नवी ऊर्जा, नवा जोम आणि जीवनाबद्दल नवा द्रुष्टीकोन घेऊन जाल. पुनःपुनः तुम्हाला निसर्गाची हाक ऐकू येत राहील हे देखील निश्चित समजा. नैसर्गिक वातावरणात तुम्हाला स्वतःच्या शरीराचे म्हणणे ऐकता यावे याकडे आमचा कटाक्ष आहे. लक्षात घ्या, आपल्यासाठी कायम झिजणाऱ्या आपल्या शरीराची सर्वतोपरी काळजी घेणे आपले परम कर्तव्य आहे. केवळ आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची सक्ती नाही. संजीवन नेचर क्युअरला भेट द्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या…